Null

Events By Agri Dept.

कृत्रिम बुध्दिमत्ता (AI) तंत्रज्ञान वेदर स्टेशन व सेंन्सर स्थापित करण्यास प्रारंभ

ऊस उत्पादन खर्चात बचत होवून उत्पन्नात वाढ होणारा एक आश्वासक पर्याय म्हणून ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता (AI) तंत्रज्ञान समोर आले आहे. कृषी विज्ञान केंद्र, बारामती, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट, पुणे, महाराष्ट्र राज्य साखर संघ व कारखाना यांच्यामधील करारानुसार लागण हंगाम 2025-26 मध्ये ऊस उत्पादनात कृत्रिम बुध्दीमत्ता (AI) तंत्रज्ञान वापरण्याकरिता कारखान्याच्या 158 सभासद शेतक-यांनी 103.70 हे.आर. क्षेत्राकरिता सहभाग घेतला आहे. याकरिता प्रती शेतकरी प्रती हेक्टरी शेतकरी वर्गणी रू. 9,000/- व कारखाना वर्गणी रू. 6,750/- असे रू. 15,750/- इतकी वर्गणी कारखान्याने स्वनिधीतून भरलेली आहे. तसेच व्ही.एस.आय. पुणे यांचेकडून प्रती शेतकरी रू. 9,250/- वर्गणी स्वरूपात खर्च करणार आहे. दिनांक 08/10/2025 रोजी तळंदगे, ता. हातकणंगले येथे कृत्रिम बुध्दिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचे वेदर स्टेशन व सेंसर स्थापित करण्याचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर (केन) किरण कांबळे, जवाहर सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन सुरेश भोजकर, व्हाईस चेअरमन दिनकर सोलणकर, सिस्टीम मॅनेजर हितेन असर, उपमुख्य शेती अधिकारी भास्कर पट्टणकुडे, ॲग्री ओव्हरसियर अमित चौगुले, युवराज पाटील, शेती विभाग, जवाहर पाणी पुरवठा संस्था व फसल कंपनीचे कर्मचारी तसेच तळंदगे गावातील शेतकरी उपस्थित होते.

माणगाव येथे AI वेदर स्टेशन व सेंन्सर स्थापीत

इचलकरंजी सर्कल अंतर्गत माणगाव गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे सभासद श्री जयपाल शेटे यांच्या प्लॉटमध्ये वेदर स्टेशन व सेंसर आज दिनांक 8/10/2025 इ रोजी बसविण्यात आले त्यावेळी आपल्या कारखान्याचे सिनियर ॲग्री ओव्हरसियर अजित चौगुले, ॲग्रीओव्हरसियर शितल मगदूम, अभयकुमार पाटील तसेच फसल कंपनीचे व कारखाना स्टाफ आणि माणगाव गावांतील शेतकरी उपस्थित होते

यमगर्णी येथे AI वेदर स्टेशन व सेंन्सर स्थापीत

दिनांक 8/10/2025 इ रोजी कोगनोळी सर्कल अंतर्गत यमगर्णी गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या श्री शरद रामगोंडा पाटील यांच्या ऊस प्लॉटवर वेदर स्टेशन व सेंसर स्थापित केले. याप्रसंगी कारखान्याचे सिनियर ॲग्री ओव्हरसिअर अजित चौगुले ॲग्री ओव्हरसिअर एस. के. पाटील, फसल कंपनीचे व कारखाना स्टाफ आणि यमगर्णी गावांतील शेतकरी उपस्थित होते

नेज येथे AI वेदर स्टेशन व सेंन्सर स्थापीत

दिनांक 9/10/2025 रोजी कुंभोज सर्कल अंतर्गत नेज गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे प्रगतशील शेतकरी सभासद शामगोंडा बापू पाटील यांच्या प्लॉटमध्ये वेदर स्टेशन व सेंन्सर बसविण्यात आले त्यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले, संचालक गौतम इंगळे, सिनियर ॲग्री ओव्हरसियर अजित चौगुले, ॲग्रीओव्हरसियर प्रविण चौगुले, नेज गावातील प्रगतशील शेतकरी व सभासद दिपक खोत, शांतिनाथ नकाते, बी.जी पाटील, आदित्य चौगुले तसेच गावातील शेतकरी आणि फसल कंपनी व कुंभोज सर्कल स्टाफ उपस्थित होते

टाकवडे येथे AI वेदर स्टेशन व सेंन्सर स्थापीत

इचलकरंजी सर्कल अंतर्गत टाकवडे गावांमध्ये ऊस उत्पादनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान वापरात सहभागी असणारे शेतकरी श्री गजानन सदाशिव सुलतानपुरे यांच्या प्लाट मध्ये आज वेदरस्टेशन व सेंन्सर बसविण्यात आले याप्रसंगी डि.के.टी.ई. कॉलेजचे प्रा. उदय नुली सर सभासद गजानन सुलतानपुरे, कारखान्याचे सिनीयर ॲग्रीओव्हरसियर अजित चौगुले, ॲग्रीओव्हरसियर अभयकुमार पाटील सभासद शेतकरी व सर्कल स्टाफ सुनिल कदम, राजू बेडक्याळे, महावीर चौगुले, देवगोंडा मगदूम हजर होते.

बेडकीहाळ येथे AI वेदर स्टेशन व सेंन्सर स्थापीत

बोरगाव सर्कल अंतर्गत बेडकीहाळ गावामध्ये आधुनिक AI तंत्रज्ञानाचा वापर करणारे प्रगतशील शेतकरी डॉक्टर विलास गणेश जोशी यांच्या प्लॉटमध्ये दिनांक 09/10/2025 रोजी वेदर स्टेशन व सेंन्सर बसविण्यात आले. याप्रसंगी उपस्थित माननीय संचालक सुनिल नारे तसेच सिनियर ॲग्री ओव्हरसियर अनिलकुमार चौगुले, ॲग्री.ओव्हरसियर पंकज पाटील तसेच भोज व बोरगाव सर्कल स्टाफ व शेतकरी उपस्थित होते.

कृत्रिम बुध्दिमत्ता (AI) तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढ परिसंवाद संपन्न

ऊस उत्पादक शेतक-यांच्या उत्पादनात वाढ होवून तो समृध्द होण्यासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने विविध ऊस विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. शेतीची सुधारीत पध्दत व शास्त्रोक्त तंत्रज्ञानाची सखोल माहिती कारखान्याच्या सभासद शेतक-यांना व्हावी यासाठी कार्यक्षेत्रामध्ये वेळोवेळी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आणि कारखान्याच्या शेती तज्ञांकडून मार्गदर्शनासाठी परिसंवादाचे आयोजन केले जाते. या अंतर्गत कृत्रिम बुध्दिमत्ता (AI) या नविन व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढ या विषयावर कारखाना कार्यस्थळावर दिनांक 17/05/2025 रोजी परिसंवाद संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक प्रकाशआण्णा आवाडे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये जवाहर कारखाना, डी.के.टी.ई. व व्ही.एस.आय. पुणे यांचे सहकार्याने ऊस उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी सभासद शेतक-यांना एआय तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार असल्याचे सांगीतले. यामध्ये सहभागी होणा-या शेतक-यांना कारखान्याकडून एकूण खर्चाच्या 50% रक्कमेचे अनुदान दिले जाणार असून उर्वरीत 50% रक्कम ही पुढील 2 हंगामात येणा-या ऊसाच्या बिलातून वसूल केली जाणार आहे. हे तंत्रज्ञान कारखाना पुरस्कृत जवाहर सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या. तळंदगे च्या संपूर्ण क्षेत्रावर तसेच कारखाना कार्यस्थळावर ही राबविणेत येणार आहे. आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादन वाढीसाठी विविध ऊस विकास योजनांची कार्यवाही अत्यंत प्रभावीपणे सुरवातीपासून चालू आहे. सध्या सर्वच क्षेत्रात कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर वाढत आहे. त्यामुळे ऊस शेतीतही हे तंत्रज्ञान वापरणे काळाची गरज आहे. असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगीतले. व्ही.एस.आय. पुणे चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग यांनी एआय तंत्रज्ञानामुळे ऊस पिकाला गरजेप्रमाणे अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन होवून सेंद्रीय घटकांचा पुरवठा केल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढून ऊस उत्पादनात 40% वाढ होते. यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होवून उत्पादन खर्चात 30% पर्यंत बचत होते. एआय तंत्रज्ञानामुळे मातीचा सामु, क्षारता, ओलावा, नत्र, स्फुरद, पालाश व हवामानातील बदलाची माहिती दर्शविणा-या अत्याधुनिक सेंंसर मुळे पाणी, खत, कीड व रोगांच्या नियंत्रणाच्या नियोजनामध्ये मदत होते. याकरिता सेंसरच्या संदेशाप्रमाणे शेतक-यांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे. प्रगतशील शेतकरी मोहन नवले यांनी एआय मुळे ऊस पिकाला आवश्यक असणा-या घटकांची अचूक माहिती सेंसरद्वारे उपलब्ध होते. पण मिळालेल्या संदेशाप्रमाणे कार्यवाही वेळच्या वेळी करणे गरजेचे आहे. जवाहर साखर कारखाना नेहमीच शेतक-यांना विविध ऊस विकास योजनांच्या माध्यमातून मदत करीत असून ठिबक सिंचन, क्षारपड निचरा चर योजना व ड्रोनद्वारे औषधे फवारणी या नवनविन तंत्रज्ञानाचा सर्वात अगोदर अंमलबजावणी करून कालानुरूप ऊस उत्पादनाचे तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहचवत आहे ही अभिमानास्पद बाब आहे. शाश्वत ऊस उत्पादनासाठी एआय तंत्रज्ञान हे सध्या काळाची गरज असून शेतक-यांचा सहभाग आणि प्रतिसाद ऊस उत्पादन वाढीसाठी महत्वाचा आहे. परिसंवादाचे दिपप्रज्वलन कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांनी केले. परिसंवादाकरिता आजी माजी संचालक व सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जनरल मॅनेजर (केन) श्री. किरण कांबळे आणि सूत्रसंचालन श्री. सुभाष गोटखिंडे यांनी केले. शेवटी व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

AI तंत्रज्ञान मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

शेतक-यांचे ऊस उत्पादन वाढीसाठी AI तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीकरिता कृषी विज्ञान केंद्र बारामती, व्ही.एस.आय. पुणे, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ व आपला कारखाना यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला असून या तंत्रज्ञानाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता कारखाना प्रयत्नशील आहे. लागण हंगाम 2025-26 करिता कारखान्याच्या 158 शेतक-यांनी त्यांच्या 103.70 हे.आर. क्षेत्रामध्ये ऊस उत्पादनात AI तंत्रज्ञानाचा वापर करणेसाठी सहभाग नोंदविला आहे. या सहभागी शेतक-यांना त्यांच्या ऊस क्षेत्राबाबत सिंचन, रासायनिक खते, किड व रोग यांची लक्षणे व त्यावरील उपाययोजना याबाबत कृषिक ऍ़प वरून घ्यावयाची माहिती, फसल ऍ़प व मॅप माय क्रॉप इत्यादीबाबत सहभागी शेतकरी, ऍ़ग्री ओव्हरसियर व संबंधीत स्टाफ यांना सविस्तर मार्गदर्शन करणेकरिता मंगळवार दि. 18/11/2025 रोजी रोजी दुपारी 1.30 वाजता कारखाना कार्यस्थळावरील कामगार भवन येथे मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केलेली होती. या कार्यशाळेस कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथील श्री. अरूण पडुळ (ऍ़ग्रॉनॉमिस्ट), श्री. अभिजीत गदादे (कृषक ऍ़प तंत्रज्ञ), श्री. अविनाश पांगरकर (की हेड फसल ऍ़प) व व्ही.एस.आय. पुणे येथील श्री. डॉ. एस. ए. सुरवसे (वैज्ञानिक अधिकारी), श्री. जी. ई. आत्रे, तसेच कारखान्याच्या केन कमिटीचे चेअरमन मा.श्री. दादासो सांगावे, संचालक मा.श्री. आण्णासो गोटखिंडे, डी.के.टी.ई. चे आय.टी. विभागप्रमुख प्रा. उदय नुले, उपमुख्य शेती अधिकारी श्री. भास्कर पट्टणकुडे, सिस्टिम मॅनेजर श्री. हितेन असर, 87 शेतकरी, सिनियर ऍ़ग्री ओव्हरसियर, ऍ़ग्री ओव्हरसियर व संबंधीत स्टाफ 54 असे एकूण 141 जण हजर होते. स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे जनरल मॅनेजर(केन) श्री.किरण कांबळे यांनी केले. सुरवातीस 1) कृषक ऍ़पचे तंत्रज्ञ श्री. अभिजीत गदादे यांनी अद्यापही कृषक ऍ़प न घेतलेल्या शेतकज्यांनी प्ले स्टोअरवरुन कृषक ऍ़प डाऊनलोड करुन घ्यावे. आतापर्यंत सहभागी 101 शेतकज्यांना शिफारशी दिल्या आहेत. त्या शिफारशीनुसार खतांचे डोस द्यावेत. शेतकज्यांनी त्यांना येणाज्या अडचणी ग्रुपवर पाठवाव्यात असे सांगीतले. 2) श्री. अरुण पडुळ यांनी कृषक ऍ़प कसे वापरावे याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये पीक आरोग्य माहिती NDVI, दाट वनस्पती EVI, पाण्याचा वेध नकाशा WWM व पीक ताण नकाशा CTM हे प्रमुख 4 नकाशे कसे पाहावेत याची सविस्तर माहिती दिली. अ) पीक आरोग्य माहिती नकाशामध्ये स्पॉटवर बोट ठेवल्यास हिरवा रंग दिसत असल्यास पिकाची वाढ चांगली, पिरळा रंग -पीकाची वाढ मध्यम ते चांगली, नारंगी रंग-पीकाची वाढ मध्यम ते चांगली आणी तांबडा रंग दिसत असल्यास पिकाची वाढ कमी आहे असे समजावे. ब) दाट वनस्पती नकाशामध्ये पीकाची रोगप्रतिकारकशक्ती कोणत्या भागात कशी आहे समजते. मोबाईलवर कीड रोगांचा ऍ़लर्ट येतो.त्यानंतर 3 ते 4 दिवस निरिक्षण करावे. 50 टक्के पेक्षा जादा प्रमाण असलेस पुर्ण प्लॉटवर शिफारशीप्रमाणे फवारणी करावी. यासाठी AI शिफारसमध्ये दिलेली माहिती पाहावी. क) पाण्याचा वेध नकाशामध्ये पाणी किती दिले याची माहिती मिळते.जमिनीस आवश्यक तेवढेच पाणी द्यावे. 0.6 ते 0.7 असल्यास गडद निळा रंग, 0.5 ते 0.6 फिकट निळा रंग, 0.4 ते 0.6 असल्यास सर्वसाधारण चांगले व 0.4 पेक्षा कमी असल्यास पाण्याची उपलब्धता कमी दर्शविते. याप्रमाणे प्रत्येक 7 दिवसाची माहिती मिळते. ड) पीक ताण नकाशामध्ये पाणी, हवामान, खते, कीडरोग, तापमान, पानांचे आरोग्य याची माहिती मिळते. याशिवाय S1, S2, S3, S4, S5, S6 याप्रमाणे नकाशे दिसतात. पण शेतकज्यांनी फक्त S1 व S6 हे दोनच नकाशे पाहावेत. S1 नकाशामध्ये 5 दिवसाची सरासरी माहिती मिळते. तर S6 नकाशामध्ये मागील 24 तासाची माहिती मिळते. 3) श्री.अविनाश पांगरकर यांनी सेंसरबाबत मार्गदर्शन केले. कृषक ऍ़प चालू केल्यानंतर पहिल्या पानावर AI कृत्रिम बुध्दिमत्ता प्रकल्प या सदरामध्ये माझा ऊस वर मातीचे तापमान, जमिनीतील ओलावा, तारीख व वेळ, पीक कोणते आहे, इ.माहिती समजते. यामध्ये तांबडा रंग- जादा पाणी, हिरवा रंग- वापसा स्थिती व नारंगी रंग- पाण्याची गरज आहे असे समजावे. गरजेनुसार पीकास पाणी द्यावे. सध्या फक्त कृषक ऍ़प वापरावे. दिसत नसल्यास फसल ऍ़प वापरावे. 4) श्री. समाधान सुरवसे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये रासायनिक खतांचा संतुलीत वापर करावा. जमिनीच्या प्रकारानुसार खते द्यावीत. पाण्याचा निचरा व्हावा अन्यथा मुळांची वाढ होत नाही. हवामान वगळता सर्व बाबी आपल्या हातात आहेत. यासाठी AI चा वापर आवश्यक आहे. AI मध्ये प्रत्येक बाबींचा सल्ला दिला जातो. 20 ते 25 से.मी. खोलीपर्यंत ऊसाची कार्यक्षम मुळे असतात त्यामुळे याठिकाणी बसवलेल्या सेंसरद्वारे तेवढ्या थरातील सर्व घटकांची माहिती मिळते. ऊसाची बाळभरणी करणे गरजेचे आहे. फुटवे चांगले येतात. 60 व 90 दिवसांनी द्रवरुप खतांची फवारणी करावी. 120 दिवसांनी मोठी बांधणी (भरणी) करावी. AI मध्ये पाणी, खते, किटकनाशके, तणनाशके ही साधणे कमीतकमी वापरावयाची आहेत. त्यामुळे मेसेजप्रमाणेच कार्यवाही करावी. शेतकज्यांना येणाज्या अडचणीबाबत ग्रुपवर मेसेज केल्यास 2 ते 3 दिवसात सल्ला दिला जाईल. 5) श्री. आत्रे यांनी ऊसावरील रोग व किडी आणि त्यांचे नियंत्रणासाठी करावयाची उपाययोजना याची माहिती दिली. यानंतर सहभागी शेतक-यांनी विचारलेल्या प्रश्नांना संबंधीत अधिका-यांकडून समर्पक उत्तरे देण्यात आली तसेच शेतक-यांचे शंका समाधान झाल्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.